आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला बारा जागा देण्याची मागणी पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. महायुतीतल्या तीन प्रमुख पक्षांनी प्रत्येकी चार जागा रिपाईला द्याव्यात, असं ते म्हणाले.
विदर्भातल्या उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड, वाशिम या मतदारसंघांसाठी आठवले आग्रही आहेत. राज्यात लढवणार असलेल्या एकूण जागांची यादी दोन दिवसांत आपण महायुतीला देऊ, या सर्व जागा आमच्याच चिन्हावर लढवू, असंही आठवले यांनी स्पष्ट केलं.