डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जागतिक आव्हानांचा सामना विकसनशील देशांनी एकजुटीनं करावा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

अनिश्चितता, भूराजकीय युद्ध, रोगराई अशा जागतिक आव्हानांचा सामना विकसनशील देशांनी एकजुटीनं करावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ संघटनेच्या शिखर बैठकीत ते बोलत होते. दूरस्थ पद्धतीनं ही बैठक झाली. वातावरण बदल, आरोग्य, खाद्य आणि ऊर्जा सुरक्षेचा सामना या देशांना करावा लागतो आहे. दहशतवाद, कट्टरतावाद आणि फुटीरतावाद हे देखील समाजाला धोकादायक असल्याचं ते म्हणाले.  व्यापार आणि दळणवळणाला प्रोत्साहन, शाश्वत विकास उद्दिष्ट आणि महिलांचा; ‘विकास प्रक्रीयेत’ वाढता सहभाग या मुद्द्यांवर भारत प्रतिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. 

 

किफायती तंत्रज्ञानाची देवाण घेवाण आणि वित्तपुरवठ्याचा ओघ सुकर करण्याच्या दृष्टीनं ग्लोबल साऊथ संघटनेच्या सदस्य देशांनी सलोख्याने व्यवहार करावे असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी केलं आहे. ग्लोबल साऊथ संघटनेच्या तिसऱ्या शिखर बैठकीत आज ते बोलत होते. जागतिक पातळीवर विविध क्षेत्रातल्या संघर्ष आणि तणावाचा दुष्परिणाम विकसनशील देशांना सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत आपलं परस्पर हित समजून घेण्यासाठी ग्लोबल साऊथ संघटना कार्यरत आहे, असं ते म्हणाले. सद्यस्थितीत जागतिक अर्थव्यवस्थेतली जोखीम कमी करण्यासाठी उत्पादनप्रक्रीयेचं मोठ्या प्रमाणावर विकेंद्रीकरण करण्याची आवश्यकता असल्याचं जयशंकर म्हणाले.

 

जगभरातल्या देशांच्या विकास योजनात ग्लोबल साऊथनं मोठी भूमिका घ्यावी, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. या परिषदेतल्या अर्थमंत्र्यांच्या सत्रात त्या बोलत होत्या. परस्पर सहकार्य वाढवून विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी सर्व देशांना केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा