सुनिता विल्यम्स यांचं पुनरागमन पुन्हा तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांचं पृथ्वीवरील नियोजित पुनरागमन पुन्हा एकदा तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर पडलं आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोचवणाऱ्या बोईंग स्टारलाईन अंतराळयानाला पुन्हा एकदा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्यानं, सुनीता विल्यम्स यांचा अंतराळ मुक्काम वाढला आहे.
सहा जूनला पृथ्वीवरून निघालेले अंतराळयान १४ जूनला पृथ्वीवर परतणार होतं, मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्याच आगमन २६ जूनपर्यंत लांबलं. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासानं अद्याप नवीन यासंदर्भातील नवीन तारीख जाहीर केली नाही. यापुर्वी यानात पाच ठिकाणी हिलियम गळती आढळून आल्यानंतर आणि २८ अग्णिबाणांपैकी पाच अग्णिबाणांना तांत्रिक समस्या निर्माण झाल्या होत्या. यान परतण्यासाठी किमान १४ अग्णिबाणांचं कार्य योग्यपद्धतीनं चालणं आवश्यक आहे.