डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 21, 2024 8:04 PM | nps intermediaries

printer

राष्ट्रीय निवृती वेतन प्रणाली मध्यस्थक संघटनेचा प्रारंभ

राष्ट्रीय निवृती वेतन प्रणाली मध्यस्थक संघटनेचा आज अधिकृरित्या प्रारंभ झाला. मुंबईत भारतीय विमा संस्थेत आज सेक्युअरिंग टुमॉरो, विथ पेन्शन  या विषयावर आयोजित परिषदेदरम्यान या संस्थेचा प्रारंभ केला गेला. यावेळी निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाचे  अध्यक्ष डॉ. दीपक मोहंती यांच्या हस्ते संघटनेच्या बोधचिन्हाचे अनावरणही केले गेले. वित्तीय सुरक्षेच्या बाबतीत जागतिक उदाहरण म्हणून प्रस्थापित होण्याच्या अनुषंगाने ही संघटना आपले सदस्य आणि नियामकांच्या मार्गदर्शनानुसार नेतृत्व करेल, असा विश्वास डॉ. दीपक मोहंती यांनी यावेळी व्यक्त केला.

 

या ऐतिहासिक उपक्रमामुळे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीशी संबंधित परिसंस्थेतील सर्व प्रमुख भागधारकांना एका मंचावर आणणे शक्य झाले आहे, त्यांच्यामधले परस्पर सहकार्य वाढू शकणार आहे, तसेच निवृत्ती वेतन प्रणालीच्या लाभार्थी सदस्यांचे हीत जपण्याची व्यवस्था अधिक बळकट होऊ शकणार आहे, आणि त्याचबरोबर भारताच्या नागरिकांसाठी सेवा निवृत्ती नियोजनाचे एक महत्त्वाचे साधन म्हणून राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या सातत्यपूर्ण विकासालाही चालना मिळू शकणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा