डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

राज्यात आचारसंहितेच्या काळात कारवाईत ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्यात आचारसंहितेच्या काळात विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत कालपर्यंत एकूण ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.  आज पुण्यातून १३८ कोटी रुपयांचं सोनं जप्त केल्याचं वृत्त आहे. 

 

कालच्या एका दिवसात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. धनशक्तीचा वापर करुन मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी आयकर विभाग देखील पुढे सरसावला आहे. विधानसभा निवडणुकांच्या काळात पैशांचा गैरवापर रोखण्याच्या उद्देशानं प्राप्तीकर विभागानं मुंबई इथं नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. हा नियंत्रण कक्ष आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास सुरु असेल. राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या एकूण १ हजार १४४ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी ९९ टक्के म्हणजेच १ हजार १४२ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा