विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध अंमलबजावणी संस्थांच्या कारवाईत १५ ऑक्टोबरपासून आतापर्यंत ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. तर सी व्हिजिल ऍपवर आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या ४ हजार ७११ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४ हजार ६८३ तक्रारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे.
मुंबईत नेरूळमध्ये एका घरातून २ कोटी ६० लाखां रुपयांची रोख रक्कम नवी मुंबई पोलिसांनी जप्त केली. कोल्हापूर विधानसभा मतदार संघात आतापर्यंत १० कोटी ७१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.