विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या उत्पादित होणाऱ्या, अवैध मार्गाने राज्यात येणाऱ्या दारूवर कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं. नांदेड परिक्षेत्रातल्या उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजाचा आढावा सूर्यवंशी यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस उप निरीक्षकांनी मागच्या दोन महिन्यात दारुबंदी संदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसंच कर्नाटक आणि तेलंगणा राज्याची सीमा असलेल्या भागात तपासनाके उभारल्याचं सांगितलं.
Site Admin | October 23, 2024 3:23 PM | Maharashtra Assembly Elections
अवैध मार्गाने राज्यात येणाऱ्या दारूवर कारवाई होणार
