मतदान केंद्रांची माहिती घरबसल्या मिळावी यासाठी मुंबईतल्या मतदारांना घरपोच पत्र दिली जात आहेत. त्यात दिलेला QR कोड स्कॅन केला की मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्याचा नकाशा मिळेल, अशी माहिती मुंबईचे जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान मुंबईतल्या काही मतदान केंद्रांमध्ये लागलेल्या रांगा आणि मतदारांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आल्याची, तसंच एका मतदान केंद्राच्या ठिकाणी १० पेक्षा जास्त केंद्रं असल्यास ही केंद्रं जवळच्या ठिकाणी हलवण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं. मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी विविध प्रयत्न सुरू असल्याचंही ते म्हणाले.
Site Admin | October 16, 2024 7:26 PM | Assembly Elections | Mumbai