आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडी म्हणून, एकत्र लढणार असून, जागा वाटपासाठी चर्चा सुरु असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. ते आज बारामतीत बातमीदारांशी बोलत होते. आठवडाभरात या बाबत निर्णय होऊन त्यानंतर घटक पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतील, असं ते म्हणाले. आरक्षण प्रश्नाशी संबंधित घटकांनी सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सरकारनंही याबाबतीत विलंब न करता लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा, असं ते म्हणाले.
Site Admin | September 22, 2024 7:22 PM | Assembly Elections | MVA | Sharad Pawar