डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात

काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी केंद्र सरकारने निमलष्करी दलाच्या जवळपास तीनशे तुकड्या तैनात केल्या आहेत.  यात सीआरपीएफ, बीएसएफ, एसएसबी आणि आयटीबीपी या निमलष्करी दलांचा समावेश आहे. श्रीनगर, हुंदवडा, गंदेरबाल, बडगाम, कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोरा, अनंतनाग, शोपियां, पुलवामा, अवंतीपोरा, आणि कुलगाम जिल्ह्यात निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. 

 

तीन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीची पहिली अधिसूचना काल जाहीर करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातलं मतदान १८ सप्टेंबर, दुसऱ्या टप्प्यातलं २५ सप्टेंबर आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा