डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 23, 2024 10:26 AM

printer

झारखंडमध्ये विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार

 

झारखंडमध्येही विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात होत आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 13 नोव्हेंबरला, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय जनता दल यांनी उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली.

 

झारखंड मुक्ती मोर्चानं 35 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, तर आरजेडीनं सहा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसने 21 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. मुख्यमंत्री आणि जेएमएमचे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन बरहेत मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, तर सभापती रवींद्र नाथ महतो यांना नाला मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.

 

कल्पना सोरेन गांडे मतदारसंघातून लढणार आहेत. आरजेडीचे राज्यप्रमुख संजय कुमार सिंह यादव यांना हुसैनाबाद मतदारसंघातून तिकीट देण्यात आले असून, माजी मंत्री सुरेश पासवान देवघर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा