प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या कोणत्याही पाच मतदान केंद्रावरच्या VVPAT चिठ्ठ्या मोजणं आवश्यक आहे. यानुसार २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी प्रत्येक मदारसंघातल्या प्रत्येकी पाच मतदान केंद्रावरच्या VVPAT चिठ्ठ्या मोजण्यात आल्या होत्या, असं निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. त्यावेळी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते असंही यात म्हटलं आहे. या मोजणीनुसार २८८ मतदारसंघातल्या १ हजार ४४० V V PAT युनिटची मोजणी करून ते संबंधित कंट्रोल युनिट डाटाशी जुळवून पाहण्यात आलं. दोन्हींची मोजणी केली असता आकड्यात कुठलीही तफावत आढळून आली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगानं मतमोजणीवेळी सर्व प्रक्रियेचं पालन केलं आहे, असं पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.
Site Admin | December 10, 2024 3:24 PM | Assembly Election | Maharashtra