डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचं ‘चित्ररथ’

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसनं तयार केलेल्या चित्ररथाचं उद्घाटन आज मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते, आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. 

 

राज्यातल्या महायुती सरकारनं गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पाठवले, राज्यातली साडेसात साख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५ लाख रोजगार गुजरातनं पळवले, असा आरोप पटोले यांनी यावेळी केला. या लुटीची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याचं काम काँग्रेसचा ‘प्रचाररथ’ करणार असल्याचं ते म्हणाले. 

 

हरियाणातली आणि महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेस आपल्या मित्र पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवतो हे लोकसभा निवडणुकीत सर्वांनी पाहिले आहे, त्यामुळे काँग्रेसवर काहीही आरोप केलेले सहन केले जाणार नाहीत असा इशारा पटोले यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना दिला.

 

विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा