डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग

झारखंड मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला असून विविध पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. हेमंत सोरेन सरकारनं झारखंड मधल्या जनतेची फसवणूक केली असल्याची टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल झारखंड मधल्या गढवा इथं केली.

 

ते आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपचे झारखंड चे प्रभारी हेमंत बिसवा सरमा यांनी मतांसाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन बांग्लादेशी घुसखोरांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला. तर २०१९ मध्ये भाजपने आपल्या सरकार विरुद्ध कट रचल्याचा आरोप मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला.

 

दरम्यान आज रांची आणि लोहरदग्‍गा इथ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रचार सभा होत आहे. उत्‍तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याही प्रचार सभा होणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा