डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात

राज्यात विधानसभा निवडणुका अखेरच्या टप्प्यात आल्याने उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर इथं वार्ताहर परिषद घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड शो केला. त्यानंतर ते आज दुपारी चांदवड आणि संध्याकाळी कोल्हापुरात इचलकरंजी इथे जाहीर सभा घेणार आहेत. 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे आज नागपुरात उमरेड इथे जाहीर सभा घेत आहेत. महाविकास आघाडीची प्रचाराची समारोपाची जाहीर सभा आज मुंबई इथे होणार आहे. या सभेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. भाजपाचे तीन केंद्रीय मंत्री आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यासह अनेक वरिष्ठ नेते प्रचारासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत भांडूप इथे जाहीर सभा घेणार आहेत. 

बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची आज दुपारी पुण्यात प्रचार सभा होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या मुंबईत प्रचार सभा होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा