आसामच्या ढोलाई, समगुरी, बेहाली, सिडली आणि बोंगाईगाव या पाच विधानसभा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं. सत्ताधारी भाजपनं तीन जागांवर, तर यूपीपीएल आणि असम गण परिषदेने प्रत्येकी एका जागेवर अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसनं पाचही जागांवर उमेदवार उभे केले आहेत. आप आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटनं, अनुक्रमे दोन आणि एका जागेवर उमेदवार उभे केले आहेत.
Site Admin | October 28, 2024 2:51 PM | Assam | Assembly by-election
आसामच्या पाच जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी
