केंद्र सरकारच्या अस्मिता खेलो इंडिया उपक्रमामुळे मुली आणि महिलांचा क्रीडा स्पर्धांमधला सहभाग लक्षणीयरीत्या वाढत आहे, असं केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितलं. भारतीय खेल प्राधिकरण, खेलो इंडिया तसंच ज्युदो असोसिएशनच्या वतीनं ‘अस्मिता खेलो इंडिया’ या उपक्रमाअंतर्गत पश्चिम विभागाच्या वुमन्स लीग ज्युदो स्पर्धेला आज नाशिक इथं खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. अशा स्पर्धांमुळे युवतींना प्रोत्साहन मिळून त्यांचं सबलीकरण होत असल्याचं त्या म्हणाल्या. या स्पर्धेत महाराष्ट्रासह राजस्थान, छत्तीसगड, गुजरात , गोवा, मध्य प्रदेश आणि दीव – दमण अशा सात राज्यांच्या ८९४ खेळाडूंनी भाग घेतला आहे.
Site Admin | September 1, 2024 7:34 PM | Asmita Khelo India