डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांची उपान्त्य फेरीत धडक

कझाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धांमध्ये भारताच्या अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांनी आज महिला दुहेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली आहे. यामुळं त्यांचं पदक निश्चित झालं आहे. उपान्त्यपूर्व फेरीत त्यांनी दक्षिण कोरियाच्या किम न्योंग आणि ली युन्हये या जोडीचा ३-१ असा पराभव केला. अहिका-सुतीर्थ उपान्त्य फेरीत आता जपानच्या मिवा हरिमोटो आणि मियु किहारा या जोडीशी खेळणार आहेत.

दरम्यान, पुरुष एकेरीत मानुष शाह आणि मानव ठक्कर यांनी १६ व्या फेरीत प्रवेश केला. तर हरमीत देसाईला दक्षिण कोरियाच्या लिम जोंगूनकडून ३२ व्य फेरीत ०-३ प्रभाव पत्करावा लागला. महिला एकेरीत माणिक बत्राचा सामना जपानच्या मिवा हरिमोटोशी होणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा