अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावरचा कर एक महिन्यासाठी पुढे ढकलल्यामुळे आज आशियाई शेअर बाजारांमधे तेजी दिसून आली. त्याचा मोठा परिणाम भारतीय बाजारांमध्ये दिसून आला आणि सेन्सेक्स एकाच दिवसात सुमारे चौदाशे अंकांनी वधारला. गेल्या ४ सत्रात सेन्सेक्सनं ३ हजार २०० अंकांची तेजी नोंदवली आहे. दिवसअखेर आज सेन्सेक्स १ हजार ३९७ अंकांनी वाढून ७८ हजार ५८४ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ३७८ अंकांची वाढ नोंदवत २३ हजार ७३९ अंकांवर बंद झाला.
Site Admin | February 4, 2025 8:09 PM | Mumbai Share Market
आशियाई शेअर बाजारांमधे तेजी
