ओमानमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठ गटाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियासोबत होणार आहे. अ गटात असलेल्या भारताचा हा अखेरचा गटसाखळी सामना असेल. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता हा सामना सुरू होईल. भारतानं याआधीचे आपले तिन्ही सामने जिंकले असून, सध्या भारत गुणतालिकेत ९ गुणांसह आघाडीवर आहे.
काल झालेल्या सामन्यांत भारतानं भारतानं चिनी तायपेईचा १६ – ० असा पराभव केला, तर दक्षिण कोरियाला जपानकडूडन २-० असा पराभव पत्कारावा लागला.
या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या ४ डिसेंबरला होणार आहे.
Site Admin | December 1, 2024 3:17 PM | Hockey | Oman