केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पुण्यातल्या सी-डॅक अर्थात प्रगत संगणक विकास केंद्राच्या प्रांगणात आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रातल्या शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
प्रगत संगणक तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी सी-डॅक आधीपासून काम करत असल्याचं त्यांनी वेळी सांगितलं. देशातल्या सर्व शाळा- महाविद्यालयांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भर देत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.