नवीन युगात केवळ कायदा पुरेसा असू शकत नाही, गुन्हेगारी रोखण्यासाठी तांत्रिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केलं. सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेच्या ६२व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्ली इथं काल आयोजित करण्यात आलेल्या २१व्या डी. पी. कोहली स्मृति व्याख्यानमालेत ते बोलत होते.
नवीन युगातील आव्हानं विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सीबीआयनं स्टार्टअप्स, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांकडे अधिक सहकार्यानं पाहिलं पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले.