चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांमध्ये १ लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या स्मार्टफोनची निर्यात केली असल्याचं इलेक्ट्रॅानिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाज माध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेमुळे देशातल्या स्मार्टफोनची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४५ टक्क्यांनी वाढल्याची माहिती त्यांनी दिली. चालू आर्थिक वर्षात स्मार्टफोनची निर्यात १ लाख ७० हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.
Site Admin | December 24, 2024 3:00 PM | Minister Ashwini Vaishnav