डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 11, 2024 7:11 PM | ashvini vaishnav

printer

केंद्र सरकार आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कायदा करण्याच्या विचाराधीन

केंद्र सरकार आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर नियंत्रण आणणारा कायदा करण्याच्या विचाराधीन असून, यावर सभागृहाचं एकमत अपेक्षित असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत सांगितलं. देशात एक व्यापक भारत एआय मिशन सुरू करण्यात आलं असून, त्यात एआय कंप्युट सुविधा निर्माण करणं, कौशल्य फ्रेमवर्क, स्टार्ट-अप्ससाठी वित्तपुरवठा, इनोव्हेशन सेंटर, डेटासेट प्लॅटफॉर्म तयार करणं आणि नवीन प्लिकेशन तयार करणं यावर भर असेल  यासंदर्भात अन्य एका प्रश्नावर उत्तर देताना वैष्णव यांनी, छत्रपती संभाजीनगर इथं कृत्रिम प्लिकेशनचं काम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यामुळे सेमी कंडक्टर उद्योगासह शेती उत्पादनाला देखील चालना मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी यासंदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा