बांगलादेशात हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून काल नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनूस यांनी शपथ घेतली. बांगलादेशाचे राष्ट्रपति महंमद शाहबुद्दीन यांनी त्यांना ढाका इथ वंग भवन इथ पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मोहम्मद युनूस यांचा जन्म 28 जून 1940 रोजी झाला. ते बांगलादेशातील नामवंत उद्योगपती, बँकर आणि अर्थतज्ञ आहेत. ग्रामीण बँकेची स्थापना करून सूक्ष्म पातळीवर कर्ज आणि अर्थपुरवठा याबाबत त्यांनी केलेल्या कार्याबद्दल 2006 मध्ये त्यांचा नोबेल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मोहम्मद युनूस यांच अभिनंदन केल असून शुभेच्छा दिल्या आहेत. बांगलादेशातील परिस्थिती लवकरात लवकर सामान्य होऊन तिथल्या हिंदू आणि इतर अल्पसंख्यांक नागरिकांना सुरक्षितता बहाल होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसच दोन्ही देशादरम्यान विकास, शांती आणि सुरक्षेसंदर्भात काम करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे असही प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या समाज माध्यमांवरील संदेशात म्हंटल आहे.