कथित अबकारी धोरण घोटाळ्यात केंद्रीय अन्वेषण संस्थेने केलेली अटक कायम ठेवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या खटल्यावर तातडीने सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आज सरन्यायाधीशांना केली. यावर विनंतीचा ई मेल तपासल्यानंतर सुनावणीची तारीख जारी केली जाईल, असं सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी सांगितलं.
५ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांची अटक कायम ठेवली होती. केजरीवाल यांना झालेली अटक कोणत्याही पूर्वग्रहातून झालेली नाही असं न्यायालायाने स्पष्ट केलं होतं.