कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी २५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीचा कालावधी संपल्यामुळे राऊज ॲव्हन्यू न्यायालयातील सुनावणीसाठी तिहार कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांना हजर केलं. याआधीच सीबीआयनं कथित मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि इतर आरोपींविरोधात न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होते.
दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकेला आव्हान देणारी तसंच जामीन मिळण्यासाठी केलेल्या याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही. याचप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेता दुर्गेश पाठक याला नवी दिल्लीत एका न्यायालयानं जामिन मंजूर केला.