दिल्ली सरकारच्या कर्मचाऱ्यांकरता निवृत्तीनंतर घरं बांधण्यासाठी केंद्र सरकारनं सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. ते आज दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. जमिनीची मागणी करणारं पत्र आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठवल्याचंही त्यांनी सांगितलं. अशी जागा उपलब्ध झाली तर दिल्ली सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी घरं बंधू शकेल. सर्वप्रथम सरकारी स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, असंही ते म्हणाले.
Site Admin | January 19, 2025 7:59 PM | Arvind Kejriwal