डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी अथवा इतर व्यावसायिक शिक्षणाला कलेची जोड दिली गेली पाहिजे – राज्यपाल सी पी राधाकृष्णन

कला हा इतर प्रत्येक विषयाला समृद्ध करणारा विषय असून कला विषयामुळे जाणिवा विस्तारतात. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी अथवा इतर व्यावसायिक शिक्षणाला कलेची जोड दिली गेली पाहिजे, असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं. राज्य शासनाच्या कला संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत काल जहांगीर कलादालन इथे संपन्न झालं ,त्यावेळी ते बोलत होते.

 

यावेळी ज्येष्ठ अमूर्त चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना राज्यपालांच्या हस्ते वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. शकुंतला कुलकर्णी यांना ज्येष्ठ कलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. प्रदर्शनासाठी राज्यभरातल्या कलाकारांकडून ७७५ कलाकृती प्राप्त झाल्या होत्या; त्यापैकी १४८ कलाकारांच्या १८० कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा