लखपती दीदी मेळाव्यात भाग घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज छत्रपती संभाजीनगर मार्गे जळगावात आगमन झालं. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, पालकमंत्री अब्दुल सत्तार, यांच्यासह स्थानिक खासदार- आमदार, तसंच जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी प्रधानमंत्र्यांचं स्वागत केलं.
जळगाव विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मदत, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रधानमंत्र्यांनी विमानतळावर उपस्थित लखपती दिदींशी संवाद साधला.
राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन देखील या कार्यक्रमासाठी जळगावात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील कार्यक्रमासाठी जळगावात आले असून त्यांचं स्वागत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं.