बांगलादेशमध्ये सध्या सुरू असलेल्या हिंसक संघर्षाच्या काळात बांगलादेशातून सुमारे एक हजार भारतीय विद्यार्थी सुखरूप परत आले आहेत. यापैकी ७७८ विद्यार्थी जलमार्गाने, तर सुमारे दोनशे विद्यार्थी हवाई मार्गाने भारतात परत आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. ढाका इथलं भारताचं उच्चायुक्तालय, तसंच चित्तगाँग, राजशाही, सिल्हेत आणि खुलना इथली सहायक उच्चायुक्तालयं स्थानिक यंत्रणांच्या मदतीनं भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढायला मदत करत आहेत, आणि बांगलादेशातल्या विविध विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या ४ हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांशी उच्चायुक्तालय सातत्याने संपर्कात आहे, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
Site Admin | July 20, 2024 8:52 PM | Bangladesh | India
बांगलादेशातून १ हजार भारतीय विद्यार्थी मायदेशी सुखरूप परत
