नेपाळमधे सालझंडी इथं होणाऱ्या सूर्यकिरण या संयुक्त लष्करी सरावासाठी भारतीय सेनेची तुकडी रवाना झाली आहे. या सरावाची ही १८वी फेरी असून भारताच्या तुकडीत ३३४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या महिनाअखेरीपासून येत्या १३ जानेवारीपर्यंत हा सराव चालेल. घनदाट जंगलांमधे सशस्त्र अतिरेक्यांच्या कारवाया थोपवण्यासाठी तसंच नैसर्गिक आपत्ती काळात दुर्गम भागात मदत पोहोचवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण या सरावात दिलं जाणार आहे. त्याखेरीज जलद कारवाईसाठीची तयारी, हवाई मार्गाने हलचाली, वैद्यकीय प्रशिक्षण आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीनेही या सरावादरम्यान भर देण्यात येणार आहे. भारत – नेपाळ दरम्यान मैत्री संबंध दृढ करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग असल्याचं संरक्षण दलांच्या पत्रकात म्हटलं आहे.
Site Admin | December 28, 2024 2:46 PM | Indian Army