लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल काश्मीर खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळच्या भागांना भेट दिली आणि सैन्याच्या तयारीचा आढावा घेतला. कुपवाडा इथं झालेल्या दहशतवादविरोधी कारवाईत प्राणांची आहुती देणाऱ्या नाईक दिलावर खान यांना जनरल द्विवेदी यांनी श्रद्धांजली वाहिली.
यावेळी जनरल द्विवेदी यांच्यासह जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, लष्कराचे उत्तर विभागाचे प्रमुख, चिनार कॉर्प्सचे कमांडर आणि इतर अधिकारी तसंच स्थानिक नागरिक उपस्थित होते.