भारत-फ्रान्स संरक्षण सहकार्य बळकट करायच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी फ्रान्सच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. लष्करप्रमुख उद्या पॅरिसमधल्या लेस इनव्हॅलिडेस इथं फ्रान्सचे लष्करप्रमुख जनरल पियरे यांच्याशी चर्चा करतील, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. दोन्ही राष्ट्रांमधले लष्करी संबंध अधिक मजबूत करणं हे या बैठकीचं उद्दिष्ट आहे.
मंगळवारी, जनरल द्विवेदी मार्सेली इथं फ्रेंच सैन्याच्या तिसऱ्या तुकडीला भेट देऊन या तुकडीचं ध्येय आणि भूमिका, द्विपक्षीय सराव शक्ती, भारत-फ्रान्स प्रशिक्षण सहकार्य आणि फ्रेंच सैन्य आधुनिकीकरण कार्यक्रम याबद्दल जाणून घेतील. बुधवारी, जनरल द्विवेदी कार्पियाग्ने इथं स्कॉर्पियन तुकडीची सराव प्रात्यक्षिकं पाहतील.