पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा आजचा दिवस सकारात्मक पद्धतीनं सुरू झाला. तिरंदाजीत अंकिता भकत आणि धीरज बोम्मदेवरा यांनी मिश्र प्रकारात इंडोनेशियाच्या जोडीचा ५-१ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत जागा मिळवली. यंदा दोन कास्यपदकांवर नाव कोरणारी नेमबाज मनू भाकर २५ मीटर पिस्टल प्रकारात पुढच्या फेरीत दाखल झाली. याशिवाय आज नौकानयनात विष्णू सर्वनन आणि नेत्रा कुमारन, तसंच गोल्फमध्ये शुभंकर शर्मा आणइ गगनजीत भुल्लर मैदानात उतरणार आहेत. हॉकी स्पर्धेत आज भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असेल. तर बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य सेन लढत देईल. याशिवाय महिलांची ५ हजार मीटर आणि पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धाही आज होणार आहेत.
Site Admin | August 2, 2024 3:29 PM | Paris Olympics 2024