नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या पशु-पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास अबाधित राहावा या हेतूने करण्यात आलेल्या बहुचर्चित पर्यावरण संवर्धन कायद्याला युरोपीयन संघातील पर्यावरण मंत्र्यांच्या गटाने मंजूरी दिली.जंगलांचं संवर्धन,ओसाड जमीन ओलिताखाली आणणं आणि नद्यांना मुक्तवाहिनी करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. युरोपियन संघातील ६६ टक्के लोकसंख्येचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या २० सदस्यांनी या कायद्याच्या बाजूने मतदान केलं.२०३० पर्यंत युरोपियन संघातील जमिनी आणि सागरी क्षेत्रांपैकी किमान २० टक्के क्षेत्र पुनःस्थापित करणं आणि पुनःस्थापनेची आवश्यकता असलेल्या सर्व परिसंस्थांना पुनरुज्जीवित करण हे या कायद्याचं उद्दिष्ट आहे. आकडेवारीनुसार, सुमारे ८० टक्के अधिवासांची अवस्था बिकट आहे. याव्यतिरिक्त, मधमाश्या आणि फुलपाखरांच्या १० टक्के प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे.मातीच्या गुणवत्तेतही ७० टक्क्यांनी घट झाली आहे.