उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीनं राज्यात ८१ हजार कोटी रूपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे कोकण, मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असून, राज्यात सुमारे २० हजार जणांसाठी प्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.
या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, तसंच उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते.