वाहन स्क्रॅपिंग धोरणाचा एक भाग म्हणून, जुन्या वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी महाराष्ट्रात सहा नोंदणीकृत सुविधा केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.
या केंद्रांच्या सेवेचा लाभ घेणाऱ्या वाहनधारकांना नवीन वाहन खरेदी करताना एकंदर करात 10 टक्के सवलत मिळणार असल्याचं परिवहन विभागाने म्हटलं आहे.
प्रदूषण कमी करणे, रस्ते सुरक्षा वाढवणे, इंधन कार्यक्षमता सुधारणे, देखभाल खर्च कमी करणे आणि नवीन वाहनांद्वारे अर्थव्यवस्थेला चालना देणे हे या धोरणाचं उद्दिष्ट आहे.