राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन सचिव संजय सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर लोकप्रतिनिधींची नियुक्ती होत होती, मात्र प्रथमच ही जबाबदारी एका सनदी अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली आहे. राज्य सरकारमध्ये भरत गोगावले यांचा समावेश झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त होतं.
Site Admin | February 6, 2025 7:21 PM | राज्य परिवहन महामंडळ | संजय सेठी
वरिष्ठ सनदी अधिकारी संजय सेठी यांची एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
