राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल पाच राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली. मिझोरामचे राज्यपाल डॉ. हरी भाऊ कभांम्पती आता ओडिशाचे राज्यपाल असतील. ओडिशाचे राज्यपाल रघुवर दास यांनी राजीनामा दिल्यामुळे कभांम्पती यांना राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी केंद्रिय मंत्री जनरल विजय कुमार सिंग यांची मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बिहारचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यापुढे केरळचे राज्यपाल म्हणून काम पाहतील आणि केरळचे सध्याचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांच्याकडे बिहारच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसंच माजी गृह सचिव अजय कुमार भल्ला यांची मणिपूरचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
Site Admin | December 25, 2024 11:28 AM
देशातल्या पाच राज्यांच्या राज्यपालांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याद्वारे नियुक्ती
