सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी राज्यातल्या 6 लाख 25 हजार 139 ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज पात्र ठरले आहेत. या योजनेअंतर्गत 65 वर्षांवरील पात्र ज्येष्ठ नागरिकांना एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. या ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणारं अपंगत्व, अशक्तपणा यावरच्या उपाययोजनांसाठी आवश्यक सहाय्य साधनं खरेदीसाठी, मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्रातल्या प्रबोधन आणि प्रशिक्षणाकरता हे अर्थसहाय्य मिळणार आहे.