‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मराठी भाषेत केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील, असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज स्पष्ट केलं. या योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत असून अर्जाच्या प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे मराठी भाषेतल्या अर्जांचा विषय चर्चेला आला होता. परंतु ही अडचण संबंधित बँकेनं सोडवली असून मराठीत केलेले अर्ज नामंजूर किंवा अमान्य होणार नाहीत. हे अर्ज इंग्रजीत पुन्हा भरावे लागतील असा अपप्रचार केला जात आहे, त्याची गरज नाही, असंही तटकरे यांनी स्पष्ट केलं.
Site Admin | August 2, 2024 6:37 PM | Maharashtra
‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी मराठी भाषेतले अर्ज ग्राह्य धरले जातील’
