डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जेएएमच्या प्रवेश परीक्षांसाठीचे अर्ज ३ सप्टेंबरपासून भरता येणार

पदव्युत्तर शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा जेएएम च्या प्रवेश परीक्षांसाठीचे अर्ज ३ सप्टेंबरपासून भरता येणार आहेत. यासाठी आयआयटी दिल्लीने एक नोंदणी संकेतस्थळ तयार केलं आहे. या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षांच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवता येईल. प्रवेश परीक्षा २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार असून येत्या ११ ऑक्टोबर पर्यंत त्यासाठीचे अर्ज भरता येतील. ही परीक्षा संगणक आधारीत होणार असून यामध्ये जैवरसायन शास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, भूगर्भविज्ञान, गणित, गणितीय सांख्यिकी आणि भौतिकशास्त्र या विषयांच्या ७ प्रश्नपत्रिका असतील.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा