२०२२ – २३ या वर्षाकरता प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय युवा पुरस्कारांठी युवांनी मोठ्या प्रमाणात अर्ज करावेत असं आवाहन केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे.
आरोग्य, मानवी हक्क, नागरिक म्हणून जबाबारीपूर्ण कार्य तसंच सामाजिक सेवा अशा विकास प्रक्रिया आणि सामाजिक कार्याशी संबंधित विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या १५ ते २९ वर्ष वयोगटातल्या युवांना तसंच संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. पदक, प्रमाणपत्र तसंच व्यक्तगत एक लाख, तर संस्थांना तीन लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.