डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 30, 2024 7:08 PM | APMC | Market

printer

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला पणन मंत्र्यांची दिली भेट

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर जर अतिक्रमण झाले असेल तर ते अतिक्रमण तात्काळ निर्मूलन करण्यात येईल असं राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज नवी मुंबईत म्हटलं आहे. वाशी इथल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देत विविध प्रकल्पांची पाहणी त्यांनी आज केली. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. कायदा कडक करण्यापेक्षा व्यापार आणि मार्केट सुरळित करणे हा मुख्य हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं. बाजार समितीच्या आवारातल्या इमारती धोकादायक झाल्या असून येणाऱ्या शंभर दिवसांच्या योजनेमध्ये या बाबत वेगाने निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात येईल असं ते म्हणाले. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा