अपेडा, अर्थात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात प्राधिकरणानं महाराष्ट्रातून अमेरिकेला भारतीय डाळिंबाच्या व्यावसायिक निर्यातीची पहिली खेप पाठवली आहे. गेल्या आठवड्यात सागरी मार्गानं ‘भगवा’ जातीच्या भारतीय डाळिंबाच्या सुमारे १४ टन वजनाच्या चार हजार ६२० पेट्यांची पहिली खेप अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचली असून ताज्या फळांच्या निर्यातीमधला हा महत्त्वाचा टप्पा असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
डाळिंबांचं शेल्फ लाईफ ६० दिवसांपर्यंत वाढवण्यासाठी अपेडानं ICAR- राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या सहकार्यानं केलेलं संशोधन यशस्वी ठरल्यामुळे भारतानं सागरी मार्गानं चाचणी स्तरावर डाळींब निर्यातीची पहिली खेप पाठवली.