राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ सालचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार प्रकाश बुद्धिसागर यांना जाहीर झाला आहे. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार शुभदा दादरकर यांना जाहीर झाला आहे. संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजय महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे. तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव हा पुरस्कार २०२३ या वर्षासाठी शशिकला झुंबर सुक्रे यांच्या नावाची घोषणा झाली असून, २०२४ या वर्षाठीचा पुरस्कार जनार्दन वायदंडे यांना जाहीर झाला आहे.
या पुरस्कारांशिवाय बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. सर्व पुरस्कारार्थींचे मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.