छत्तीसगड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं मुंबईत तीन बांग्लादेशींना अटक केली आहे. भारतात बेकायदेशीर वास्तव्य करून बनावट कागदपत्रांआधारे इराकला जाण्याचा त्यांचा विचार होता. मोहम्मद इस्माईल, शेख अकबर, शेख साजन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रायपूरच्या टिकरापारा भागात राहाणारे हे तिघेही गेल्या महिन्यात रेल्वेने मुंबईला आले होते. मुंबई एटीएसच्या मदतीने या तिघांनाही मुंबईच्या पायधोनी भागात अटक करण्यात आली आणि सोमवारी त्यांना रायपूरला परत आणण्यात आले.
Site Admin | February 11, 2025 10:07 AM | छत्तीसगड पोलिस | दहशतवाद विरोधी पथक | बांग्लादेशी अटक
छत्तीसगड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं मुंबईत तीन बांग्लादेशींना केली अटक
