आसाममधे दिमा हासो जिल्ह्यातल्या उम्रांग्सो कोळसा खाणींमधे पुराचं पाणी शिरल्यानं मृत्युमुखी पडलेल्या आणखी एका खाणकामगाराचा मृतदेह आज मदतपथकाने बाहेर काढला. केंद्रीय आणि राज्यसरकारी यंत्रणांची मदतपथकं गेले ६ दिवस कार्यरत आहेत.
गेल्या सोमवारी या रॅटहोल खाणींमधे पाणी शिरल्यानं ९ कामगार अडकले होते. यापूर्वी एक मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. या खाणी बेकायदेशीरपणे चालवल्या जात असून या दुर्घटनेसंदर्भात आतापर्यंत २ जणांना अटक झाली आहे.