महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत दंतवैद्यकीय उपचारही समाविष्ट करण्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधान परिषदेत केली. ही योजना तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी खासगी रुग्णालयांपर्यंत पोहोचून शिष्टमंडळाद्वारे त्यांच्याशी संवाद साधण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या झोपडपट्ट्यांच्या तिसऱ्या-चौथ्या मजल्याचं सर्वेक्षण करण्यासाठी वरिष्ठ आयएएस अधिका-यांची नियुक्ती करु, आणि चौकशी अहवाल पुढच्या अधिवेशनात सादर करु, असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिलं. यासंदर्भात लक्षवेधीवर चर्चा सुरू आहे.
Site Admin | July 1, 2024 5:53 PM | डॉ. तानाजी सावंत | महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनादंतवैद्य